उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २० विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीमध्ये पुणे येथील कंपनीत निवड
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीमध्ये एम एस्सी (गणित, संख्याशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) व एम ए (इंग्रजी) ह्या विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे येथील अपथिंक एज्युटेक सर्व्हिसेस प्रा लि या कंपनीने घेतलेल्या चाचणी परीक्षा व परिसर मुलाखतीद्वारे विद्यापीठातील २० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
विद्यापीठातील विविध प्रशाळेतील १४४ विद्यार्थ्यांची ऑनलाईन चाचणी परीक्षा व मुलाखत मार्च महिन्यात घेण्यात आली होती. त्यातील २० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या परिसर मुलाखतीसाठी पुणे येथील अपथिंक एज्युटेक सर्व्हिसेस प्रा लि या संस्थेचे प्रतिनिधी तेजश जगताप, तुषार जंगले, सुरेखा मोरे, वर्षा पाहुजा व ऋषिकेश कुलकर्णी यांनी ऑनलाईन चाचणी परीक्षा व मुलाखत घेतली. त्यात एम एस्सी (संख्याशास्त्र) मधील १) प्राची विनोद बडगुजर, २) जागृती पाटील, ३) मानसी दिनेश देशमुख, ४) निलेश कैलास साळुंखे, ५) नितेश साठे, ६) प्रांजल वानखेडे, ७) रोहित चावरे, ८) जागृती सोनवणे, ९) तुषार माळी, १०) उमेश सुतार, ११) मिथीलेश वानखेडे, १२) प्राजक्ता सातभाई, १३) ऋतुजा येवले, १४) साक्षी बडगुजर तसेच एम एस्सी (गणित) मधील १) तन्वी पाटील, २) धनश्री धांडे, ३) गिताली होले, ४) शुभांगी सुपे, ५) प्रांजल सिंगवी, ६) अंकिता उदावंत या विद्यार्थ्यांनी निवड करण्यात आली आहे.
गणितशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा एस आर चौधरी, समन्वयक डॉ एच एल तिडके, पदार्थविज्ञान प्रशाळेचे समन्वयक डॉ जे पी बंगे व केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे समन्वयक प्रा रमेश सरदार, उपसमन्वयक डॉ उज्वल पाटील, प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा यांनी चाचणी परीक्षा व ऑनलाईन मुलाखतीचे व्यवस्थापन केले होते. या विद्यार्थ्यांचे कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.