देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 105 विद्यार्थ्यांची विविध उच्च नामांकित कंपन्यामध्ये निवड

सिव्हिल इंजिनिअरींग विभागाच्या 105 विद्यार्थ्यांची विविध उच्च नामांकित कंपन्यामध्ये निवड

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडल संचलित देवगिरी इन्स्टीटयूट ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज मधील सिव्हील इंजिनिअरींग विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या परीसर मुलाखतीमध्ये 105 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कोअर प्रोजेक्ट इंजिनिअरर्स ॲण्ड कन्सल्टंट प्रा लि कॉस्मो प्रथम मर्यादित, व्हि डी सी कन्सल्टंट,पुणे, पी सी पी लॅब्स, लॅडमार्क संकल्पना, स्थापत्य सॉफ्टवेअर प्रा लि, युनिक इंजिनिअरर्स ॲर्ण्ड काँट्रॅक्टस, पुणे, टाटा स्टील चॅनेल पार्टनर्स व इंटेलेज प्रा लि इ उच्च नांमाकित कंपनीमध्ये निवड झाली आहे.

Selection of 105 students of Devagiri College of Engineering in various highly reputed companies
निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत मशिप्र मंडळाचे कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ सुभाष लहाने, विभागप्रमुख डॉ गजेंद्र गंधे, डॉ सत्यावान धोंडगे, प्रा संजय कल्याणकर, डॉ राजेश औटी, डॉ सचिन बोरसे, डॉ शोएब शेख, डॉ रुपेश रेब्बा, प्रा अमरसिंह माळी, व प्रा कविश पटवारी आदि.

ही मुलाखत घेण्यासाठी कंपनीचे एच आर आणि अॅडमीन विभागाचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थीत होते. या परीसर मुलाखतीमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, टेकनिकल रांऊड, ग्रुप डिस्कशन आणि एच आर रांऊड अशातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. परीसर मुलाखत घेण्यासाठी कंपनीचे एच आर ॲण्ड ॲडमीन विभागाचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थीत होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सर्वेक्षक आणि विविध विभागामध्ये काम करण्याची संधी मिळेल.

निवड झालेल्या विद्यार्थाचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ प्रकाशदादा सोळुंके, सचिव आ सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, कार्यकारीणी सदस्य विश्वास येळीकर, प्रदीप चव्हाण, महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ सुभाष लहाने, विभागप्रमुख डॉ गजेंद्र गंधे, डॉ सत्यवान धोंडगे, प्रा संजय कल्याणकर, डॉ राजेश औटी, डॉ सचिन बोरसे, डॉ शोएब शेख, डॉ रुपेश रेब्बा, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा अमरसिंह माळी व प्रा कविश पटवारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com