प्रा राजेंद्र जैन यांना संस्कृत व प्राकृत साहित्यात द्वितीय पीएच डी जाहीर
रामटेक : प्रा राजेंद्र चिंतामणी जैन यांना नुकतीच तिरूपति येथील राष्ट्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्यावतीने “संस्कृतरूपकेषु प्राकृतस्य स्थानं, स्वरूपं योगदानञ्च” या संस्कृतात मांडलेल्या प्राकृतसाहित्य विषयावर पीएच डी जाहीर झाली आहे. श्रीवेंकटेश्वरवेदविश्वविद्यालय (तिरूपति) चे कुलगुरू प्रो राणी सदाशिवमूर्ती यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
राजेंद्र जैन यांचे संस्कृत विषयातील लौकिक शिक्षण राष्ट्रीय संस्कृत विश्वविद्यालय, तिरूपति (आंध्रप्रदेश) व जगतगुरू रामानंदाचार्य राजस्थान संस्कृत विश्वविद्यालय जयपुर (राजस्थान) येथे पूर्ण झाले असून सदर संशोधन संस्कृतसाहित्य व प्राकृतसाहित्य या दोन्हींमध्ये मोलाचा दुवा ठरणार आहे. राजेंद्र जैन हे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (रामटेक) मधील संस्कृत-साहित्य विभागात मागील अकरा वर्षापासून कार्यरत असून त्यांना संस्कृतविषयावरील पहिली पीएच डी (विद्यावाचस्पति) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथून वर्ष २०१२ मध्ये प्राप्त आहे.
सदर आणखी एक उपलब्धी बद्दल कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी, संकायप्रमुख प्रो कविता होले, प्रो मधुसूदन पेन्ना व समस्त विश्वविद्यालय परिवारातर्फे त्यांचे यानिमित्ताने अभिनंदन केले.