एमजीएम विद्यापीठात भाभा अणु संशोधन केंद्रच्या शास्त्रज्ञांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद

छत्रपती संभाजीनगर :
महत्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या (एमजीएम) सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटच्या वतीने भाभा अणु संशोधन केंद्र (बार्क), मुंबई येथील शास्त्रज्ञांसोबत विद्यार्थी संवाद सत्राचे आयोजन आर्यभट्ट सभागृहात करण्यात आले.

या कार्यक्रमात शास्त्रज्ञ डॉ. बी. एस. धाबेकर, शास्त्रज्ञ डॉ. कमल शर्मा आणि शास्त्रज्ञ डॉ. बबिता तिवारी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत अणुऊर्जा क्षेत्रातील संशोधन, करिअर संधी व शैक्षणिक मार्गदर्शन केले.

Scientists from the Bhabha Atomic Research Centre interacted directly with students at MGM University.
Scientists from the Bhabha Atomic Research Centre interacted directly with students at MGM University.

कार्यक्रमाला एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख डॉ. परमिंदर कौर, प्राध्यापकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

संवाद सत्रात डॉ. बी. एस. धाबेकर यांनी ‘डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जीचा प्रेरणादायी इतिहास’ या विषयावर माहिती दिली.
डॉ. कमल शर्मा यांनी ‘डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जीमधील करिअर संधी’ यावर सविस्तर मार्गदर्शन केले, तर
डॉ. बबिता तिवारी यांनी ‘होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ यांनी सांगितले की, आज विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रांत मोठ्या संधी उपलब्ध असून यशासाठी सातत्याने ज्ञानार्जन आवश्यक आहे. एमजीएम विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.

Scientists from the Bhabha Atomic Research Centre interacted directly with students at MGM University.
Scientists from the Bhabha Atomic Research Centre interacted directly with students at MGM University.

उद्घाटनपर भाषणात कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी एमजीएम संस्था गेल्या चार दशकांपासून शिक्षण, आरोग्य, सेवा व संशोधन क्षेत्रात कार्यरत असून विद्यापीठात सात विद्याशाखांद्वारे दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. परमिंदर कौर यांनी केले, तर सूत्रसंचालन सिमरन कौर यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com