तैवानच्या NDHU विद्यापीठातील शास्त्रज्ञांची शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा अवकाश संशोधन केंद्राला भेट
कोल्हापूर/ पन्हाळा : शिवाजी विद्यापीठ आणि तैवानच्या नॅशनल डोंग ह्वा विद्यापीठ (NDHU) यांच्यामध्ये समाजाचा करार करण्यात आला आहे. या करारा अंतर्गत शिवाजी विद्यापीठातील पद्युत्तर अभ्यासक्रमास शिकत असलेले विद्यार्थी तसेच विद्यापीठातील प्राध्यापक यांना तैवान येथे अभ्यास, वैज्ञानिक प्रकल्प आणि संशोधन कार्य करण्यास मार्ग मोकळा झाला आहे. या कराराच्या निमित्ताने त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्राला सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी अवकाश संशोधन केंद्रामध्ये कार्यरत असणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांची संवाद साधून विविध अत्याधुनिक उपकरणांची आणि केंद्रामध्ये सुरू असलेल्या संशोधन कार्याची प्रामुख्याने माहिती जाणून घेतली. तसेच अत्याधुनिक सिस्टर फिफ्टी आणि 12 इंची दुर्बिणीच्या साह्याने आकाश निरीक्षणाचा आनंद सुद्धा लुटला अशी माहिती अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव हटकर यांनी दिली. याप्रसंगी तैवान येथील प्रा. चांग प्रा. चिन-चिह ली, प्रा. वँग-ची येह, प्रा. यी चिआ चेन, शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, डिपार्टमेंट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी चे डायरेक्टर डॉक्टर के के शर्मा आणि आणि डॉक्टर डोंगळे हे उपस्थित होते.