सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयास NAAC मूल्यांकनात ‘A+’ मानांकन प्राप्त
छत्रपती संभाजीनगर : सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचालित श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयास NAAC (National Assessment And Accreditation Council, Bangaluru) मूल्यांकनात A+ मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन 1 फेब्रुवारी 2024 पासून पुढील पाच वर्षांसाठी असेल. नॅक मूल्यांकनासाठी नॅक पिअर टीमच्या तीन सदस्यीय समितीने दिनांक 18 व 19 जानेवारी 2024 रोजी महाविदयालयास तपासणी भेट दिली. यासाठी संस्था पदाधिकारी, नियामक मंडळ व महाविदयालय विकास समितीचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. दिनेश वकील, उपाध्यक्ष डॉ. सुहास बर्दापूरकर, उपाध्यक्ष डॉ. बी. वाय. क्षीरसागर, सरचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे, कोषाध्यक्ष मिलिंद रानडे तसेच महाविदयालय विकास समितीचे सभापती दीपक पांडे व माजी सभापती ओमप्रकाश राठी यांनी समाधान व्यक्त करुन मिळालेल्या उच्च दर्जाच्या मानांकनाबददल प्राचार्य डॉ. मकरंद पैठणकर, उपप्राचार्य डॉ. एम. एम. गायकवाड, उप्राचार्य डॉ. प्रमोद देव, आयक्यूएसी समन्व्यक डॉ. विक्रांत पांचाळ, डॉ. गोरख काकडे तसेच महाविदयालयाचे सर्व प्राध्यापक-शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थ्यांचेही विशेष अभिनंदन केले.