सौ के एस के महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
बीड : सौ के एस के महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या आदराने आणि उत्साहाने साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभात प्रास्ताविक करताना डॉ ज्योती क्षीरसागर म्हणाल्या, “सावित्रीबाई फुले यांनी दैववाद आणि अंधश्रद्धा यावर प्रहार केला. त्यांनी समाज परिवर्तनाचे आणि महिलांना शिक्षणात आणण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांनी भिडेवाडी येथे मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा स्थापली, जी आजही प्रेरणादायक आहे.” त्या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ञ आणि कवयित्री होत्या, आणि त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिकेच्या रूपात ओळखले जाते. त्यांचा पती महात्मा ज्योतीराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतीय महिलांच्या अधिकारांसाठी महत्वाची भूमिका निभावली. सावित्रीबाई फुले यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.
कार्यक्रमात गीतांजली शेळके या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पल्लवी इरलापल्ले यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ व्ही एस फटाले यांनी मानले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रा किशोर काळे, संस्था प्रशासक डॉ सुधाकर गुट्टे, डॉ विश्वांभर देशमाने, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर संचालक डॉ खान ए एस, उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा जालिंदर कोळेकर तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला श्रद्धांजली अर्पण केली आणि समाजातील परिवर्तनासाठी शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले.