सौ.के.एस.के. महाविद्यालयातील कॅप्टन डॉ.बालासाहेब पोटे भूगोल विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर  

बीड : येथील सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य  वरिष्ठ महाविद्यालयातील कॅप्टन डॉ.बालासाहेब तुकाराम पोटे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोल अभ्यासमंडळावर सदस्य म्हणून  निवड झाल्याबद्दल संस्था उपाध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.कॅप्टन डॉ.बालासाहेब तुकाराम पोटे  सौ.के.एस.्रके.महाविद्यालयात भूगोल विभागाचे विभाग प्रमुख असून 15 वर्षापासून महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करतात.त्याबद्दल मा.कुलगुरू महोदय डॉ.प्रमोद येवले यांनी विषय तज्ञ म्हणून त्यांची निवड केली आहे.ते बीड एन.सी.सी.चे प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत.

Sau . K.S.K. College Captain Dr. Balasaheb Pote appointed on  Geography study board of University


या सत्कार समारंभ प्रसंगी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर,उपप्राचार्य डॉ्र.शिवाजी शिंदे,पदव्युत्तर संचालक डॉ.सतीश माऊलगे,कमवि उपप्राचार्य डॉ.एन.आर.काकडे,पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर,कार्यालयीन अधिक्षक डॉ.विश्वांभर देशमाने तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com