नागपूर विद्यापीठाची विद्यार्थिनी सतनाम कौरला वक्तृत्व स्पर्धेत दोन पुरस्कार प्राप्त
वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेत मिळविला पुरस्कार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थिनी सतनाम कौर मट्टू हिने वक्तृत्व स्पर्धेत दोन पुरस्कार प्राप्त केले आहे. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन लेडी इंटरप्रिंनर विंग आणि बॅरिस्टर शेषराव वानखडे ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत कुसुमताई वानखेडे स्मृती वादविवाद स्पर्धेचे आयोजन ३ ते ७ ऑक्टोंबर २०२४ दरम्यान करण्यात आले होते. वादविवाद स्पर्धेत प्रथम तर स्वयंस्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक सतनामने प्राप्त केला.

नागपूर येथील कुसुमताई वानखेडे हॉल येथे ‘उपाय: सोल्युशन टू बिझनेस चॅलेंजेस’ या विषयावर आयोजित वादविवाद स्पर्धेत सतनाम कौर मट्टू हिने प्रथम क्रमांक पटकाविला. वादविवाद स्पर्धेत एकूण ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. याच ठिकाणी आयोजित ‘रॅपिड फायर बिजनेस माईंड’ या या थीमवर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सतनामने ‘पृथ्वीला वाचवा’ या विषयावर स्वयंस्फूर्त भाषण देत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
एकाच स्पर्धेत दोन पुरस्कार प्राप्त करीत सतनामने पदभ्युत्तर भौतिकशास्त्र विभागाचा बहुमान वाढविला आहे. सतनामने तिच्या यशाचे श्रेय विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ ओमप्रकाश चिमणकर, डॉ अभय देशमुख व आई-वडिलांना दिले आहेत.