गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

जळगाव : गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात भारताचे “लोहपुरुष” आणि एकतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, आणि विद्यार्थी यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कार्याचा आढावा घेत भारताच्या एकतेसाठी त्यांच्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. कार्यक्रमात एकतेचे महत्त्व, सहकार्य, आणि समाजाची सेवा यावर चर्चा करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी सरदार पटेल यांच्या विचारांवर भाषणे सादर केली आणि त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याची शपथ घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com