सोलापूर विद्यापीठात सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास इनक्युबेशन उपक्रम जाहीर

नवउद्योजकांना प्रशिक्षण आणि आर्थिक लाभ मिळणार – कुलगुरू डॉ प्रकाश महानवर

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इनक्युबेशन केंद्राने आणि सारथी, पुणे  (छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे) यांनी नुकतीच सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास इनक्युबेशन उपक्रमाची घोषणा केली आहे.

सोलापूर विद्यापीठ

सारथी ही वंचित घटकासाठी काम करणारी शासकीय यंत्रणा असून ही स्कीम मराठा, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी या विशेष सामाजिक घटकांसाठी असल्याचे सारथीतर्फे सांगण्यात आलेले आहे. यामध्ये उद्यम  इंक्युबेशन न केंद्राच्या दहा नवउद्योजकांना सामावून घेण्यात येणार असून पुणे विभागीय कार्यालयामार्फत 4  इनक्यूबेशन केंद्रांचा समावेश करण्यात आला त्यात  विद्यापीठाचे उद्यम इंक्युबेशन केंद्रालादेखील स्थान देण्यात आले आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ प्रकाश महानवर यांनी केले.

Advertisement

सदर विद्यार्थी किमान पदवीधर असणे क्रमप्राप्त असून निवडलेल्या  10  उत्तम संकल्पना आलेल्या नवउद्योजकांना एका वर्षासाठी इंक्युबेशन केंद्रामध्ये सामील करून घेण्यात येणार आहे  आणि त्यांना इनक्युबेशनच्या सुविधा देखील पुरवल्या जाणार आहेत. 16 एप्रिल 2024 पर्यंत विद्यार्थी/ विद्यार्थिनींना अर्ज करता येणार असून त्यांनी सारथी च्या http://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाच्या नाविन्यता, नवउपक्रम आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ विकास पाटील यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या उद्यम इंक्युबेशन केंद्राचे व्यवस्थापक श्रीनिवास पाटील यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page