‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.२४ फेब्रुवारी रोजी (तिथीनुसार) संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, उपकुलसचिव व्यंकट रामतीर्थे, मेघश्याम सोळंके, रामदास पेदेवाड, डॉ. लक्ष्मीकांत आगलावे, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, अजय दर्शनकार, तुकाराम भुरके, संजयकुमार गाजरे, श्याम डाकोरे, सुनिल ढाले, राजु द्याडे, उद्धव हंबर्डे, लक्ष्मण हंबर्डे, बंडू कांबळे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com