संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा कार्यभार हस्तांतरण समारंभ
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नवव्या कुलगुरूपदी महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ११ (३) अन्वये विद्यापीठाच्या कुलपतींनी कुलगुरू म्हणून डॉ. मिलींद अ. बारहाते यांची नियुक्ती केलेली आहे. नियुक्त कुलगुरू डॉ. मिलींद अ. बारहाते गुरूवार, दि. २५/०१/२०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता प्रभारी कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांचे कडून कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारतील.
डॉ. मिलिंद बारहाते हे सी. पी. अँड बेरार महाविद्यालय नागपूर येथे 2010 पासून प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर त्यांनी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून 2016 ते 2022 या कालावधीमध्ये कार्य केले आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी यापूर्वी स्व. डॉ. के.जी. देशमुख, डॉ. गणेश पाटील, स्व. डॉ. एस.टी. देशमुख, डॉ. सुधीर पाटील, डॉ. कमल सिंह, डॉ. मोहन खेडकर, डॉ. मुरलीधर चांदेकर आणि स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांनी कुलगुरू पदाची सूत्रे यशस्वीरित्या सांभाळली आहेत. डॉ. मिलिंद बारहाते यांची कुलगुरू पदी निवड झाल्याबद्दल संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, प्र कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विविध प्राधिकरणीचे सदस्य, प्राचार्य, शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.