११ सप्टेंबर रोजी संत गाडगे बाबा विद्यापीठाला महालक्ष्मी पूजनाची सुट्टी जाहीर

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला बुधवार, दि ११ सप्टेंबर, २०२४ रोजी महालक्ष्मी पूजनाची सुट्टी जाहीर करण्यात आली असून त्या दिवशी सर्व प्रशासकीय विभाग बंद राहतील. दि ११ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या सुुट्टीच्या ऐवजी विद्यापीठाचे सर्व प्रशासकीय विभाग रविवार दि २२ सप्टेंबर, २०२४ रोजी नियमितपणे सुरु राहतील.

Sant Gadge Baba Amravati University, SGBAU

तरी याची सर्व पालक, विद्यार्थी, अभ्यागत, नागरिक व संलग्नित महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांनी कळविले आहे. विद्यापीठाचे स्नातकोत्तर विभागातील शैक्षणिक कर्मचाऱ्यांना (अॅकेडेमिक स्टाफ) शैक्षणिक नियमिकेप्रमाणे (अॅकेडेमिक कॅलेंडर) सुट्टी राहतील, असेही विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com