संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ११ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या हिवाळी – २०२४ परीक्षा स्थगित

विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी 2024 च्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा दि 11 नोव्हेंबर, 2024 पासून सुरू होणार होत्या व परीक्षांचे वेळापत्रक देखील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले होते, परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे सदर परीक्षा तुर्त स्थगित करण्यात आल्या असून या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितिन कोळी यांनी विद्यापीठाच्यावतीने कळविले आहे.

Sant Gadge Baba Amravati University, SGBAU

यासंदर्भात परीक्षा विभागाकडून सर्व संलग्नित महाविद्यालये, प्राचार्य, केंद्राधिकारी, परीक्षा केंद्रांना पत्राव्दारे कळविण्यात आले असून याची सर्वसंबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांनी नोंद घ्यावयाची आहे. तसेच काही अडचण असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक संचालक डॉ नितीन कोळी यांना 9850042357 मो क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.
तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा नियमित घेण्यात येणार

दि 26 डिसेंबर, 2024 पासून तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा सुरू होणार असून त्या परीक्षा यापूर्वी घोषित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com