संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 500 वृक्ष लागवड करणार


विभागीय आयुक्त, कुलगुरू, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्या हस्ते वृक्षारोपण

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरातील आपत्ती व्यवस्थापन केंद्र परिसरामध्ये नव्याने दिड किलोमीटर रस्त्याची निर्मिती करण्यात आली असून त्या रस्त्याच्या दुतर्फा जवळपास 500 विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय आयुक्त निधी पांडेय, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मनपा आयुक्त देविदास पवार यांच्या शुभहस्ते दिं. 24 जुलै, 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता होणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, वनराईचे अध्यक्ष मधूभाऊ घारड यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.

Advertisement
Sant Gadge Baba Amravati University will plant 500 trees in campus
DCIM\100MEDIA\DJI_0058.JPG

विद्यापीठाचा परिसर निसर्गरम्य असून विद्यापीठाच्या उद्यान विभागाने स्थापनेपासूनच परिसरामध्ये मोठ¬ा प्रमाणावर वृक्षारोपण आजवर केले आहे. जवळपास 4 लक्ष वृक्ष विद्यापीठ परिसरात डौलदारपणे उभे आहेत. पशूपक्षी आदींची संख्या मोठ¬ा प्रमाणावर या परिसरात आहे. निसर्गरम्य परिसरासाठी विद्यापीठाला राष्ट्रीय व राज्यस्तरीय मानाचे पुरस्कार मिळाले आह.  वृक्षारोपण कार्यक्रमाला विद्यापीठाच्या प्राधिकारिणींचे सन्माननिय सदस्य, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी तसेच विद्याथ्र्यांनी मोठ¬ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे, उद्यान अधीक्षक अनिल घोम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page