संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संघाचे राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत घवघवीत यश
कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी केला सत्कार
अमरावती : ए आय यु द्वारा आयोजित कला क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठीत अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेचे दिनांक 28 व 29 मार्च, 2025 दरम्यान महर्षि मार्कंडेश्वर विद्यापीठ, अंबाला, हरियाणा येथे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत उत्तेजनार्थ तृतीय बक्षीस पटकाविले.

संगीत क्षेत्रात मिळालेल्या अलौकिक यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी संघात सहभागी अमर कतोरे, अनिश देशमुख, अंकित कैथवास, सुमित वाहिले, सुमित आत्राम, आदित्य बगाडे, गौरी कुलकर्णी, दिव्या शेंडे, स्वरांगिनी कुळमेथे, वीणा गजभिये, हितेश व्यास, कार्तिक नंदवंशी, गौरव गजभिये आदी कलावंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्यात.
यावेळी डॉ विक्रात जाधव व डॉ योगिनी सोनटक्के यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. सत्कारप्रसंगी कुलसचिव डॉ अविनाश असनारे व विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर उपस्थित होते.