संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्रा. मनीषा लाकडे सेट परीक्षेत उत्तीर्ण
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागामध्ये सुरु असलेल्या एम.ए. समुपदेशन व मानसोपचार पद्धती अभ्यासक्रमामध्ये प्रा. मनीषा लाकडे यांनी मानसशास्त्र विषयात राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) नुकतीच उत्तीर्ण केली. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारप्रसंगी डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले, शिक्षकांसाठी असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण होणे सोपे काम नाही, परंतु प्रा. मनिषा लाकडे यांनी आपले ध्यैय निश्चित केल्यामुळे त्यांनी ही परीक्षा पास करुन दाखवली. त्यांचा आदर्श विभागातील सर्व शिक्षकांनी घ्यावा व आपल्या विषयातील ज्ञान सिध्द करावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. प्रा. लाकडे यांनी यापुर्वी सुध्दा शिक्षणशास्त्र या विषयात नेट आणि सेट ह्रा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.
प्रा. मनीषा लाकडे मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या, संचालक डॉ. श्रीकांत पाटील व आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील प्राध्यापक यांच्या प्रेरणेमुळे व मार्गदर्शनाखाली मी हे यश संपादन करु शकली. विभागातील शिक्षकांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिल्यामुळे माझा आत्मवि·ाास वाढला असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील शिक्षक डॉ. वैभव मस्के, डॉ. प्रशांत भगत, प्रा. सुरेश पवार, प्रा. मंजुषा बारबुद्धे, प्रा. जुबेर खान, प्रा. राम ओलिवकर, प्रा. विनय पदलमवार, डॉ. अश्विनी राऊत, प्रा. अनघा देशमुख, प्रा. शिवानी अग्रवाल, प्रा. माधुरी पुनसे, प्रा. अर्चना ढोरे, प्रा. संदीप महल्ले, प्रा. स्वप्निल ईखार, प्रा. स्वप्निल मोरे आदींनी प्रा. लाकडे यांचे अभिनंदन केले आहे.