संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात व्याख्यान संपन्न
अमरावती : शिक्षण घेत असलेल्या विषयासोबतच अन्य विषयांचेही ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे, या दृष्टीने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. हेमलता नांदुरकर, प्रमुख अतिथी म्हणून शिवरामजी मोघे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पांढरकवडा येथील डॉ. रमजान विरानी, विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्राचे ग्रंथपाल विशाल बापते उपस्थित होते.
माहितीचे स्त्रोत व शोधतंत्र या विषयावर विशाल बापते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विद्यापीठाचे संकेतस्थळ कसे वापरावे, याबद्दलही त्यांनी माहिती दिली. संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमापूजन, मॉ सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक डॉ. हेमलता नांदुरकर, सूत्रसंचालन ऐश्वर्या कुंडलवाल व पल्लवी नांदणे, तर आभार गायत्री तळेकर हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रा. विनोद नागले, शिक्षकवंृद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.