संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी

कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते प्रतिमापूजन व अभिवादन

अमरावती, 28 मे 2025: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आज अत्यंत सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची, प्राचार्य डॉ. व्ही. एच. नागरे, प्राचार्य डॉ. हेमंत देशमुख, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, ननसा संचालक डॉ. अजय लाड, सहायक कुलसचिव डॉ. साक्षी ठाकुर यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

कार्यक्रमाचे संचालन व सावरकर यांच्या जीवनकार्याविषयी माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सावरकरांचे योगदान, साहित्यिक कार्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्रवादावरील त्यांच्या विचारांचा ऊहापोह केला.

विद्यापीठाने अशा उपक्रमांद्वारे नव्या पिढीला देशभक्ती, शौर्य व विज्ञाननिष्ठा यांचे मूल्यसंस्कार देण्याचा प्रयत्न केल्याचे मत कुलगुरूंनी यावेळी व्यक्त केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *