संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिवस उत्साहात साजरा
बायोटेक्नॉलॉजी विभाग, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचार्य आणि रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन सेंटर यांचा संयुक्त उपक्रम
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभाग, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचार्य तसेच रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिवस साजरा करण्यात आला. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचार्य मंडळाच्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर, रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद यादव उपस्थित होते.
संचालक डॉ. स्वाती शेरेकर यांनी स्टार्टअप व इन्क्युबेशनबद्दल विद्याथ्र्यांना सविस्तर माहिती दिली. रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद यादव म्हणाले, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून नवउद्योजकांना उद्योग सुरू करता यावे, यासाठी प्रयत्न केले जाईल. याप्रसंगी नॅनो बायोटेक प्रा. लि. च्या संचालक डॉ. सुनिता बनसोड, सन हेल्थ केअर अॅन्ड सÐव्हसेस, अमरावतीचे संचालक श्री. संदीप अजमिरे, लॅबकेम अॅन्ड आकांक्षा प्रयोगशाळेचे संचालक डॉ. वैभव तिवारी, डॉ. चंद्रशेखर वडतकर यांनी विद्याथ्र्यांना उद्योग क्षेत्रातील अनुभव सांगून उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र-कुलगुरू प्रसाद वाडेगावकर म्हणाले, सध्याचा काळ उद्योजकतेकरिता सुलभ असून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहील, असा वि·ाास व्यक्त करुन त्यांनी विद्याथ्र्यांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाला विभागातील बायोटेक्नॉलॉजी विभागातील माजी विद्याथ्र्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमोल हिरुळकर यांनी, तर आभार प्रा. सुदर्शन कोवे यांनी मानले. कार्यक्रमाला विभागातील डॉ. अनिता पाटील, डॉ. वर्षा वाडेगावकर, डॉ. प्रशांत ठाकरे, प्रा. नरेश मोवळे व रवी ढेंगळे यांचे सहकार्य लाभले.