आर सी पटेल स्वायत्त अभियांत्रिकीची विद्यार्थीनीचा ‘हर इम्पॅक्ट’ या मॅग्झीनद्वारे उत्कृष्ट महिला सह-संस्थापक म्हणून गौरव
शिरपूर : आर सी पटेल स्वायत्त अभियांत्रिकीतील पदवी अभ्यासक्रमाची तृतीय वर्षाची संजीवनी प्रवीणसिंग राजपूत विद्यार्थीनीने SPWeb@Devs या स्टार्ट-अप ची सह-संस्थापक म्हणून महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. तिने २०२३ मध्ये रु १०००० च्या प्रारंभीस स्टायपेंडसह एच आर इंटर्न म्हणून तिच्या प्रवासाला सुरुवात केली आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अल्पावधीतच संचालक पदावर उल्लेखनीयरीत्या बढती प्राप्त केली. नुकतेच ‘हर इम्पॅक्ट’ या मॅग्झीनच्या सर्वोत्कृष्ट महिला सह-संस्थापकांच्या यादीत संजीवनीचा देखील समावेश करून सन्मान केला आहे.
पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विद्याशाखेत तृतीय वर्षाची संजीवनी प्रवीणसिंग राजपूत या विद्यार्थीनीने २०२३ मध्येच वेब डेव्हलपमेंट आणि अॅप डेव्हलपमेंट च्या मुख्य क्षेत्रात नवख्या असलेल्या SPWeb@Devs या नवी मुंबई स्थीत स्टार्ट-अप कंपनीत एचआर इंटर्न म्हणून करिअरला सुरुवात केली होती. विद्यार्थी दशेतच असतांना तिने इंटर्न्सचे व्यवस्थापन आणि कार्याचा मौल्यवान अनुभव मिळविण्याची संधी पटकन स्वीकारली.
कामाच्या प्रती असलेली बांधिलकी आणि नेतृत्व कौशल्यामुळे सर्वप्रथम कंपनीची शाखाधिकारी आणि नंतर अल्पावधीतच संचालक म्हणून पदोन्नती प्राप्त केली. याचबरोबर SPWeb@Devs ची सह-संस्थापक म्हणून एक विशेष ओळख निर्माण केली आहे. सह-संस्थापक म्हणून, सध्या धोरणात्मक निर्णय घेणे, ऑपरेशन्सची देखरेख करणे आणि कंपनीमध्ये सकारात्मक कार्य संस्कृती वृद्धिंगत करण्यात संजीवनी सक्रिय भूमिका यशस्वीरीत्या बजावत आहे. सध्या, कंपनीत टीम फॉलो-अप, क्लायंट डीलिंग आणि निवड प्रक्रिया अश्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत संजीवनी भरीव योगदान देत आहे.
याप्रमाणे पटेल अभियांत्रिकीची विद्यार्थिनी संजीवनीचा शिक्षणासोबतच नोकरीचा प्रवास सिद्ध करतो की दृढनिश्चयाने आणि आत्मविश्वासाच्या साह्याने उल्लेखनीय संधी प्राप्त होऊ शकतात व त्या संधीचे सोने निर्माण करून उज्वल आयुष्याचे आपणच स्वतःच शिल्पकार होऊ शकतो. याचबरोबर ‘हर इम्पॅक्ट’ या मॅग्झीन तर्फे प्रसिद्ध झालेल्या अंकात ज्या निवडक सर्वोत्कृष्ट महिला सह-संस्थापकांचा समावेश केला गेला त्यात संजीवनी राजपूतच्या शिक्षण तसेच अल्पावधीत प्राप्त केलेल्या वरील उपलब्धीचा गौरव करण्यात आला आहे.
संजीवनी राजपूत या विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव रेषा पटेल, संचालक अतुल भंडारी, महाविद्यालयाचे संचालक डॉ जे बी पाटील, उपसंचालक डॉ पी जे देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा सुहास शुक्ल, विभाग प्रमुख डॉ व्ही एस पाटील, प्रा पी एल सरोदे, प्रा जी व्ही तपकिरे, डॉ एस व्ही देसले, डॉ आर बी वाघ, डॉ डी आर पाटील, डॉ उज्वला पाटील, डॉ एस ए पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा एम पी जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.