श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक संजय भंणगे यांचा सेवा गौरव सोहळा
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक संजय भंणगे हे दि 29 जून 2024 रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने महाविद्यालयात सेवा गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे तर व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ शिवाजी मोरे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा ब्रम्हनाथ मेंगडे कार्यालयीन अधीक्षक शिवाजी भारती, कल्याण सावंत यांनी संजय भंणगे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी लोकप्रशासन विभागाचे प्राध्यापक सुहास पाटील यांनीही संजय भंणगे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी संजय भंणगे यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले महाविद्यालयीन कामकाजामध्ये रोखपाल म्हणून काम केले. अत्यंत जोखमीचे काम दैनंदिन आर्थिक व्यवहार आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची कधीच चूक न करता काम केले. तसेच वेळेचे काटेकोर नियोजन आणि कामांमध्ये उत्तम प्रकारे सेवा करणारे सहकारी आज ३५ वर्षानंतर महाविद्यालयातून सेवानिवृत्त होत आहेत.
आतापर्यंत महाविद्यालयात काका या नावाने ओळखले जाणारे संजू काका महाविद्यालयात अनुपस्थित राहणार आहेत याची खंत वाटते कारण कोणताही प्राध्यापक, शिक्षक सर्व कर्मचारी सन्मानाने काका म्हणत होते आणि ते स्थान काकांनी कायम सर्वांच्या मनामध्ये निर्माण केले. संजू काकांना पुढील आयुष्यासाठी उत्कृष्ट आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना व शुभेच्छा असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील सहकार्याने देखील याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य डॉ शिवाजी मोरे, डॉ प्रकाश कोंका, डॉ आर टी माने प्राध्यापिका छाया सोंडगे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी संजय भंणगे यांनी आपल्या जीवनात बंकटस्वामी महाविद्यालयात आलेले अनेक प्रसंग आणि सहकारी यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. तसेच माझ्यासाठी हा प्रसंग अत्यंत भावनिक आहे मला या महाविद्यालयाने व संस्थेने भरभरून दिले नावलौकिक मिळाला आणि या संस्थेतील सर्व सहकारी संस्थेचे पदाधिकारी यांचे कायम मी ऋणी राहील असे मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख डॉ शंकर धांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन हिंदी विभाग प्रमुख डॉ शंकर शिवशेट्टे यांनी मानले या कार्यक्रमाच्याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक, शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.