‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये दि ०७ सप्टेंबर, रोजी राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी रामदास खोकले, कपिल हंबर्डे, गजानन जाधव यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.