”बामू” विद्यापीठातील साक्षी बागुल विद्यार्थीनीस जिल्हास्तरीय युवा संवाद वक्तृत्व स्पर्धेत यश

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाची साक्षी बागुल हिने नेहरू युवा केंद्र संघटन तर्फे घेण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा संसद वक्तृत्व स्पर्धेत विद्यापीठाचे नेतृत्व केले . या स्पर्धेत विद्यापीठाचे नेतृत्व करीत साक्षी बागुल हीने अत्यंत प्रतिसादात्मक प्रदर्शन करून जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे विद्यापीठाच्या सोबतच महाविद्यालयाचे सुद्धा नाव लौकीक झाले.

साक्षी राहुल बागुल हिने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. ह्याचे उत्कृष्ट प्रदर्शन विद्यापीठाकरीता खूपच अभिमाननीय आहे. यावेळी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालका डॉ सोनाली क्षीरसागर यांनी तीचे अभिनंदन केले. यावेळी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कार्यक्रम अधिकारी डॉ दिनेश कोलते, श्याम बन्सवाल, अशोक भोसीकर, आणि विद्यार्थी प्रतिनिधी नाझीम पटेल, पवन जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com