राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इन्क्यूबीन फाउंडेशनमध्ये दिवाळी मिलन सोहळा उत्साहात संपन्न
प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांनी दिल्या शुभेच्छा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इन्क्युबीन फाउंडेशनमध्ये दिवाळी मिलन सोहळा नुकताच पार पडला. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांनी सर्व स्टार्टअप करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमामुळे नवीन स्टार्टअप करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट कुलगुरू महोदयांशी चर्चा करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाच्या वेळी प्रभारी कुलगुरू डॉ बोकारे यांनी इन्क्युबीन फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या नवीन स्टार्टअपची माहिती घेतली. तसेच नावीन्यपूर्ण संशोधन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. विविध संस्था तसेच उद्योगांच्या माध्यमातून अनेक नवीन प्रकल्पांना या इंक्युबेशन केंद्राच्या सहाय्याने चालना मिळेल असे कुलगुरूंनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक होण्यासाठी विद्यापीठ वातावरण निर्मिती तसेच उत्कृष्ट व्यासपीठ विद्यार्थ्यांना देत असल्याचे कुलगुरू म्हणाले. या कार्यक्रमाने संस्थेतील नवोपक्रम आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचा नवीन आयाम निर्माण झाला आहे.
यावेळी आयआयएल प्रभारी संचालक डॉ निशिकांत राऊत, इन्क्युबेन फाऊंडेशनचे संचालक डॉ अभय देशमुख, सीईओ प्रियंका राजावत, इन्क्युबेशन मॅनेजर योगेश कुंटे, तांत्रिक सहाय्यक कर्मचारी योगेश व्यास यांची उपस्थिती होती.