संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती प्रसंगी समारंभपूर्वक सत्कार
सेवेतून निवृत्त होत असले, तरी कुटुंबातून निवृत्ती नाही – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
अमरावती : विद्यापीठ एक कुटुंबच आहे व कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असले तरी, कुटुंबातून निवृत्त होत नाही, असे भावनिक प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, प्रमुख अतिथी म्हणून व्य. प. सदस्य डॉ. व्ही.एच नागरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, नियंत्रण अधिकारी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए.डी. नाईक, कासू चे संचालक डॉ. नितीन फिरके, कार्यकारी अभियंता श्री शशिकांत रोडे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे महासचिव श्री नरेंद्र घाटोळ, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, सत्कारमूर्ती डॉ. नरेंद्र शेलूरकर, सौ. शेलूरकर, श्री जगन्नाथ कावरे, श्री एन.डी. उके, सौ. उके उपस्थित होते.
कुलगुरू पुढे म्हणाले, विद्यापीठातील कर्मचारी सेवानिवृत्त होत असतांना समाधानी आहेत व हीच खरी या संस्थेच्या वाटचालीची पावती आहे. कर्मचा-यांना पदोन्नती मिळवून दिल्यानंतर एक चांगले काम आपल्या हातून झाले आणि याचे प्रशासनालाही श्रेय जाते, असे सांगून विद्यापीठात बाह्र यंत्रणेव्दारे कंत्राटी पध्दतीने शिक्षकेत्तर कर्मचा-यांची भरती करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले व सत्कारमूर्तींना पुढील भविष्याच्या शुभेच्छा दिल्यात.
यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी डॉ. नरेंद्र शेलूकर, जगन्नाथ कावरे, एन.डी. उके यांचा शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवप्रमाणपत्र देऊन, तर शेलूकर यांचा सौ. वाडेगावकर व उके यांचा डॉ. वैशाली धनविजय यांनी साडीचोळी, कुंकवाचा करंडा देऊन सत्कार केला. प्रमुख अतिथी डॉ. व्ही.एच. नागरे म्हणाले, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी कर्मचा-यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावून त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविले आहे. विद्यापीठातील कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. इतरांनी काय करावे, यापेक्षा आपण काय केले पाहिजे हे महत्वाचे असून कुलगुरूंमध्ये वादळालाही शांत करण्याचा मोठा गुण आहे, असे गौदवोद्गार काढतांना सेवानिवृत्त कर्मचा-यांना त्यांनी उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्यात.
याप्रसंगी सत्कारमूर्ती डॉ. नरेंद्र शेलूकर यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगतांना आपल्या विभागातील अनेक विद्याथ्र्यांना भारतातील मोठमोठ¬ा नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळवून दिल्याचे सांगितले. तर सत्कारमूर्ती जगन्नाथ कावरे, एन.डी. उके यांनीही आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगितले. नियंत्रण अधिकारी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए.डी. नाईक, कासू चे संचालक डॉ. नितीन फिरके, कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे महासचिव नरेंद्र घाटोळ यांनीही मनोगतातून सत्कारमूर्तींना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने उपाध्यक्ष राजेश एडले व सचिव श्रीकांत तायडे यांनी सत्कारमूर्तींना भागभांडवलाचा धनादेश देऊन सत्कार केला. राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, संचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी, तर आभार अधीक्षक श्री धनंजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच सत्कारमूर्तींच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.