उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने पीएच. डी. प्रवेश पूर्व परीक्षा रिसर्च मेथॉडॉलॉजी या कार्यशाळेचे उदघाटन

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने पीएच. डी. प्रवेश पूर्व परीक्षा ( पेट ) २०२३ नुसार तात्पुरत्या प्रवेशित विद्यार्थ्यांची रिसर्च मेथॉडॉलॉजी या विषयावरील कार्यशाळेस सोमवार दि. ५ फेब्रुवारी पासून विद्यापीठात प्रारंभ झाला. या कार्यशाळेचे उद्धाटन कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. ३७६ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, कार्यशाळेचे अध्यक्ष प्रा. पी. पी. माहुलीकर, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्रा. एस. टी. भुकन आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्रााचार्य एस. एस. राजपूत उपस्थित होते. या प्रसंगी कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांनी पीएच. डी. चा विषय निवडी संदर्भात व संशोधनासंदर्भात विविध मुद्दयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

ही कार्यशाळा दि.५ ते १० फेब्रुवारी दरम्यान विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सदरची कार्यशाळा दोन सत्रात आयोजित केली असून प्रथम सत्रात दि. ५ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील सर्व विद्यार्थी, विधी आणि माहिती व ग्रंथालयशास्त्र याविषयातील विद्यार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. उदघाटनानंतरच्या प्रथम सत्रात प्रा. बी. एल. चौधरी, व्दितीय प्रा. डी. एस. दलाल आणि प्रा. पी. पी. माहुलीकर यांनी रिसर्च मेथॉडॉलॉजी या विषयावर विद्यार्थ्यांना उदबोधन केले. या कार्यशाळेत विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील विविध विषयांचे, विधी आणि माहिती व ग्रंथालयशास्त्र याविषयातील एकूण ४०९ पैकी ३७६ विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यशाळेचे दुसऱे सत्र दि.८ ते १० फेब्रुवारी दरम्यान मानवविज्ञान विद्याशाखेतील सर्व विषय व वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा तसेच आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील विद्यार्थ्यांकरीता आयोजित केले जाणार आहे. या संदर्भातील वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार कार्यशाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी  केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com