राजमाता जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
घोडेगाव /खुलताबाद : राजमाता जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालय, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय,सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालय, व स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय घोडेगाव ता. खुलताबाद येथे 75वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 7 वाजता विद्यार्थ्यांची प्रभातफेरी घोडेगावात निघाली. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव साहेब, मुख्य अतिथी म्हणून माजी उपसरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष घोडेगाव दादासाहेब पाटील जाधव, शिवसेना उपतालुकाअध्यक्ष प्रकाश पाटील जाधव घोडेगावचे पोलीसपाटील कारभारी पाटील जाधव, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील आवारे, ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील जाधव, द्वारकादास पाटील जाधव, सुरेश गोरे, चव्हाण साहेब ,पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर पाटील जाधव गणेश घोडके दिलीप जाधव युवा नेते ज्ञानेश्वर पाटील जाधव उपस्थित होते. दिलीप जाधव यांच्या हस्ते सद्गुरु जनेश्वर माध्यमिक विद्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले.तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव साहेब यांच्या हस्ते कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थिनी देशभक्तीपर गीत व भाषणाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले. यानंतर प्रकाश पाटील जाधव व राजु पाटील आवारे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.शेवटी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव साहेब यांचे अध्यक्षीय भाषण झाले. तत्पूर्वी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या 19 व 20 जानेवारीला आंतरमहाविद्यालयीन क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या व 25 जानेवारीला निबंध व रांगोळी स्पर्धेतील प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ठाकूर मॅडम व आभार प्रदर्शन डी.डी. घुगे सर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी , महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यास प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.