उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पश्चिम विभागीय रासेयो प्रजासत्ताक दिन पथसंचलन शिबीराचा समारोप २१ नोव्हेंबर रोजी
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भारत सरकारच्या युवा कार्य व क्रिडा मंत्रालय, प्रादेशिक संचालनालय, रासेयो पुणे, आणि विद्यापीठातील रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पश्चिम विभागीय रासेयो प्रजासत्ताक दिन पथसंचलन पूर्व शिबीराचा समारोप २१ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.
या शिबीराचा समारोप विद्यापीठाचे कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी प्र-कुलगुरु प्रा एस टी इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, तसेच महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील स्टेट लायझनिंग अधिकारी डॉ निलेश पाठक प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
समारंभ गुरुवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता विद्यापीठाच्या अधिसभागृहात आयोजित करण्यात आले आहे. शिबीरात सात राज्यांतील २०० रासेयो स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. शिबीर १२ नोव्हेंबर पासून सुरू झाले होते.
रासेयो संचालक डॉ सचिन नांद्रे, रासेयो प्रादेशिक संचालक डॉ अजय शिंदे आणि कुलसचिव डॉ विनोद पाटील यांनी या शिबीराबद्दल माहिती दिली.