भारती विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पुणे : देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारती विद्यापीठाच्या एरंडवणे शैक्षणिक संकुलात कार्यवाह, प्र कुलगुरू, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील, सहकार्यवाह डॉ.के. डी. जाधव, व .भा.म्हेत्रे, डॉ. एम.एस.सगरे, कुलसचिव जी.जयकुमार उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या एनसीसी, एनएसएस पथकाने यावेळी नेत्रदीपक शिस्तबद्ध कवायती आणि संचलन करून उपस्थितांची मने जिंकली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी लाठी काठी आणि मर्दानी खेळाचे लक्षवेधी युवाविष्कार सादर करून विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. यावेळी भारती विद्यापीठाच्या शाळा व महाविद्यालयातील शाखा प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.