राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात रावबहादुर डी लक्ष्मीनारायण यांना अभिवादन

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात रावबहादुर डी लक्ष्मीनारायण यांना अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात रावबहादुर डी लक्ष्मीनारायण दिवस कार्यक्रम सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी पार पडला.

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली शताब्दी महोत्सव कक्षाचे विशेष कार्य अधिकारी प्रदीप बिनीवाले व सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक कुलसचिव गणेश कुमकुमवार यांच्या हस्ते रावबहादुर डी लक्ष्मीनारायण यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सर्वश्री जनसंपर्क अधिकारी प्रेमदास वाडकर, युडीसी शैलेश राठोड, कवडू भोयर, रुपेश आतराम, अनिल खरे, नरेंद्र पवार, आसिफ शेख, कार्तिक हरडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com