‘बामू’च्या पीएच डी कोर्सवर्कसाठी सातशे संशोधकांची नोंदणी
इंग्रजीला सर्वाधिक ८८ संशोधक
सोमवारपासून ऑनलाईन कोर्स
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने पीएच डी संशोधन करणा-या विद्यार्थ्यांसाठी आयोजित कोसवर्कमध्ये ७१८ संशोधकांनी नोंदणी केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २००९ व २०१६ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार संशोधकांना प्रबंध दाखल करण्यापूर्वी कोर्सवर्क पूर्ण करणे अनिवार्य आहे. २०२२ मध्ये ऑनलाईन पद्धतीने कोर्सवर्क घेण्यात आला. याही वर्षी पीएच डी कोर्सवर्क ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे आदेश कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी दिले आहेत.
विद्यापीठाच्या मालवीय मिशन टिचर ट्रेनिंग सेंटरच्यावतीने सोमवारपासून (दि ८) कोर्सवर्कचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ४० विषयात संशोधन करणा-या ७१८ विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, मानव्यविद्या व आंतरविद्याशाखा असा चार शाखेतील ७१८ संशोधक यात सहभागी घेण्यात आहेत. इंग्रजी विषयातील सर्वाधिक ८८ तर सामाजिक कार्य विषयाच्या एक संशोधक विद्यार्थी यात सहभागी होणार आहे. एकूण २१ ग्रुप करण्यात आले आहेत. पहिला पेपर सर्वांसाठी कॉमन आहे. तर दुसरा पेपर हा संबंधित विषयाचा असणार आहे. प्रकुलगुरू डॉ वाल्मिक सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ससाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ भारती गवळी, संचालक डॉ सतीश पाटील, सहसंचालक डॉ मोहम्मद अब्दुल राफे हे कोर्स साठी प्रयत्नशील आहेत.