सहायक कुलसचिव पवार यांनी वाढदिवसानिमित्त ५० फळांची रोपे देत सोलापूर विद्यापीठात केले वृक्षारोपण
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहायक कुलसचिव आनंद पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यापीठास विविध फळांची ५० रोपे देत वृक्षारोपण केले.


विद्यापीठाचे कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांनी पवार यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी विद्यापीठ कॅम्पसमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने कुलगुरू प्रा महानवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ केदारनाथ काळवणे, सहायक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने यंदा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध समाजसेवा संस्थांनी देखील विद्यापीठास रोपे भेट देत आहेत. याची प्रेरणा घेऊन आपण आपल्या वाढदिनी विद्यापीठात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला, असे सहायक कुलसचिव पवार यांनी यावेळी सांगितले.