राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष आर चौधरी अनंतात विलीन

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष आर चौधरी अनंतात विलीन झाले. डॉ सुभाष चौधरी यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट मोक्षधाम येथे गुरुवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ संजय दुधे यांच्या अध्यक्षतेखाली व कुलसचिव डॉ राजू हिवसे यांच्या उपस्थितीत शोकसभा पार पडली.

डॉ सुभाष चौधरी यांचे गुरुवारी पहाटे शहरातील एका नामांकित रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा अंबाझरी मार्गावरील कुलगुरू निवास स्थानावरून काढण्यात आली. यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्र- कुलगुरू डॉ संजय दुधे यांच्या अध्यक्षतेखाली अंबाझरी घाट येथे शोकसभा घेण्यात आली. यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.

दिवंगत डॉ सुभाष चौधरी यांनी ८ ऑगस्ट २०२० रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्रे सांभाळली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ आई-वडील असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com