राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या टेनिस (महिला व पुरुष) संघाची घोषणा
पाटण येथील उत्तर गुजरात विद्यापीठ येथील पश्चिम क्षेत्रिय स्पर्धेत होणार सहभागी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या टेनिस (महिला व पुरुष) संघाची घोषणा क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ प्रभारी संचालक डॉ विशाखा जोशी यांनी केली. विद्यापीठाचा महिला संघ गुजरात राज्यातील पाटण येथील हेमचंद्राचार्य उत्तर गुजरात विद्यापीठ येथे २५ ते २७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आयोजित पश्चिम क्षेत्रिय आंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होणार आहे. तर पुरुषांचा संघ ग्वालियर येथील आयटीएम विद्यापीठात ७ ते ११ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आयोजित स्पर्धेत सहभागी होणार आहे.
निवड झालेल्या संघाला प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे व कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
महिला संघ :
स्व बी एन शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूरची भूमिका दहिया, तायवाडे महाविद्यालय कोराडी येथील कल्याणी सोमेवार, रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील राधा गिरडकर व मृण्मयी कुऱ्हाडे तर राखीव खेळाडू म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागपूर येथील आस्था कुमार यांचा समावेश आहे.
पुरुष संघ. :
धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथील राज बागडी, डॉ एम वासनिक पीडब्ल्यूएस महाविद्यालय नागपूर येथील हर्षल पाटील, गुरु नानक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथील तेजस पाल, तिरपुडे महाविद्यालय येथील तरुण फुले, रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालय येथील आनंद मराठे तर राखीव खेळाडू म्हणून इंदिरा गांधी महाविद्यालयातील मनीष बिंझाडे यांचा समावेश आहे.