राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा तायकांडो (पुरुष व महिला) संघ घोषित
गुरुनानक देव विद्यापीठ अमृतसर येथील स्पर्धेत होणार सहभागी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा तायकांडो पुरुष व महिला संघाची घोषणा क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ प्रभारी संचालक डॉ विशाखा जोशी यांनी केली आहे.
अमृतसर येथील गुरुनानक देव विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायकांडो स्पर्धेत दोन्ही संघ सहभागी होत आहे. प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्रभारी प्र- कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे व मंडळाच्या सर्व सदस्यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.
तायकांडो पुरुष संघ :
डॉ हरिभाऊ आदमाने महाविद्यालय सावनेर येथील प्रतीक बोंभारे (५४ वर्ष वजन गटाखालील), श्री बिंझानी सिटी महाविद्यालय नागपूर येथील अभय ठाकूर (५८ वर्ष वजन गटाखालील), नाशिकराव तिरपुडे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचा विशाल पूजदेकर (६३ वर्ष वजन गटा खालील), प्रियदर्शनी बी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ओम मोरशेट्टीवार (६८ वर्ष वजन गटाखालील) व मृणाल वानखेडे (८७ वर्ष वरील वजन गट), भिवापूर महाविद्यालय भिवापूर येथील हिमांशू चव्हाण (७४ वर्ष वजन गटाखालील) व अभिषेक मोहिर्ले (८० वर्ष वजन गटाखालील), रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ऋषिकेश पांडे, राखीव खेळाडू म्हणून राजकमल तिडके महाविद्यालय मौदा येथील कीर्ती देवतळे (६० वर्ष वजन गटाखालील), नॅशनल फायर कॉलेज नागपूर येथील खुशाल गोतराणे (८० वर्ष वजन गटाखालील) यांचा समावेश आहे.
पूमसे वैयक्तिक प्रकार पुरुष :
भिवापूर महाविद्यालय भिवापूर येथील अभिषेक मोहिर्ले तर राखीव म्हणून नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर येथील आदर्श चोपकर यांचा समावेश आहे. पूमसे सांघिक पुरुष संघात भिवापूर महाविद्यालयातील अभिषेक मोहिर्ले, अल्पेश बावनकर हिमांशू चव्हाण यांचा समावेश आहे. पूमसे पुरुष- महिला संघामध्ये भिवापूर महाविद्यालय भिवापूर येथील कोमल बुराटकर व हिमांशू चव्हाण यांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक म्हणून डॉ संतोष चौधरी तर प्रशिक्षक म्हणून तेजांकित भोंगाडे यांची निवड करण्यात आली आहे.
तायकांडो महिला संघ :
डी बी विज्ञान महाविद्यालय गोंदिया येथील शिमन भालाभारे (४६ वर्ष वजन गटाखालील), जी के कॉलेज येथील विद्या नागपूरे (४९ वर्ष वजन गटाखालील), भिवापूर महाविद्यालय भिवापूर येथील कोमल बुरडकर (५३ वर्ष वजन गटाखालील), नागाजी महाराज एस एस महाविद्यालय नागपूर येथील विजया मेश्राम (५७ वर्ष वजन गटाखालील), वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली येथील मुस्कान राठोड (६२ वर्ष वजन गटाखालील), नाशिकराव तिरपुडे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील सायली अहलावाल (६५ वर्ष वजन गटाखालील), सिटी प्रीमियर कॉलेज नागपूर येथील अंजली कश्यप (७३ वर्ष वजन गटाखालील), सेवादल महिला महाविद्यालयातील वैष्णवी साहू (७३ वर्ष वजन गटा वरील), राखीव खेळाडू म्हणून एस एन मोर महाविद्यालय तुमसर येथील विधी देवनगन (५३ वर्ष वजन गटाखालील), डी डी भोयर महाविद्यालय मौदा येथील समीक्षा जंगले (५७ वर्ष वजन गटाखालील) यांचा महिला संघात समावेश आहे.
पूमसे :
पूमसे वैयक्तिक महिला गटात कमला नेहरू महाविद्यालय नागपूर येथील येमिनी पुष्पपातोडे व राखीव म्हणून एस एन मोर महाविद्यालय तुमसर येथील निधी देवनगन यांचा समावेश आहे. पूमसे सांघिक गटात आर एस मुंडले महाविद्यालय नागपूर येथील सेजल परतेकी, रुतिका माने, वैष्णवी मानकर यांचा समावेश असून संघ व्यवस्थापक म्हणून डॉ जी वानखेडे तर प्रशिक्षक म्हणून भारती कनोजे जबाबदारी पार पाडणार आहे.