राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी अवतरण दिन उत्साहात

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी अवतरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात गुरुवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी यांच्या प्रतिमेला हारार्पण केले.

Advertisement

यावेळी शताब्दी महोत्सव कक्षाचे विशेष कार्य अधिकारी प्रदीप बिनीवाले, सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक कुलसचिव गणेश कुमकुमवार, युडीसी शैलेश राठोड, सर्वश्री गिरीश बडनाके, अनिल खरे, नरेंद्र पवार, मनोज मोरे, कवडू भोयर, विलास कोल्हे, आसिफ शेख, शितल शेटे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page