राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता दिवसाचे आयोजन
नागपूर : भारताच्या माजी प्रधानमंत्री स्व इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘राष्ट्रीय एकात्मता दिवस’ कार्यक्रम मंगळवार, १९ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांनी भूषविले. यावेळी प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे तसेच विदयापीठाच्या विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राधिकारणीचे सदस्य, सांविधिक अधिकारी, विभाग प्रमुख, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय एकात्मता दिवसाच्या निमित्ताने, प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांनी सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. कार्यक्रमात देशाच्या विविधतेत एकता आणि सामाजिक सद्भावना कायम राखण्याचे महत्त्व उपस्थितांशी शेअर करण्यात आले.