राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा बास्केटबॉल पुरुष संघ घोषित

ग्वालियर येथील आयटीएम विद्यापीठात आयोजित पश्चिम क्षेत्रिय स्पर्धेत होणार सहभागी

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पुरुष बास्केटबॉल संघ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ प्रभारी संचालक डॉ विशाखा जोशी यांनी घोषित केला. ग्वालियर येथील आयटीएम विद्यापीठात १५ ते २० नोव्हेंबर २०२४ दरम्यान आयोजित पश्चिम क्षेत्रिय आंतर विद्यापीठ स्पर्धेत संघ सहभागी होणार आहे.

Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, RTMNU Nagpur

संघामध्ये धनवटे नॅशनल कॉलेज येथील सिद्धेश कुलकर्णी, हिमांशू शेंडे, शुभम राऊत, इलाईट कॉलेज सावनेर येथील राजेश्वर परदेशी, पियुष पिढेकर, जी एच अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथील तारण कक्कड, सिद्धेश बुराडे, हिस्लॉप महाविद्यालयातील प्रथम गुप्ता, डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागपूर येथील सार्थक धुलधुळे, ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील तन्मय चौधरी, नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर येथील शाम खेडेकर, रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील पार्थ बोरकुटे यांची निवड झालेली आहे.

तसेच राखीव खेळाडूंमध्ये जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वल्लभ त्रिवेदी, हिस्लाॅप महाविद्यालयातील रवी चौधरी, यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील वंशवर्धन सोरटे, सेंट वीसेंट अभियांत्रिकी महाविद्यालय परीक्षीत दातीर, धनवटे नॅशनल कॉलेजचा सारंग उमाटे तर कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वर्धा येथील आदर्श मोहर्ले यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com