राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आरोग्य तपासणी शिबिराचे शुक्रवारी आयोजन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सामान्य आरोग्य तपासणी, दंत तपासणी, डोळ्यांची तपासणी, नाक- कान- घसा तपासणी, फिजिओथेरपी, रक्त तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवार, दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० ते सायंकाळी ०५:०० पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या रवी नगर येथील डी लक्ष्मीनारायण परिसरातील आरोग्य केंद्रात हे शिबिर होणार आहे.
विद्यापीठातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांकरीता या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय व लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांची वैद्यकीय चमू ही आरोग्य तपासणी करणार आहे. शिबिराचे उद्घाटन प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या शुभहस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ संजय दुधे, कुलसचिव डॉ राजू हिवसे यांची उपस्थिती राहणार आहे. आयोजित शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन महिला वैद्यकीय अधिकारी डॉ सरोज शामकुवर यांनी केले आहे.