राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात डॉ सविता सावरकर यांचे व्याख्यान संपन्न

इतिहास माहीत असलेले अधिक प्रेरणेने काम करतात – डॉ सविता सावरकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व विचारधारा विभागात व्याख्यान

नागपूर : इतिहास माहीत असलेले अधिक प्रेरणेने काम करतात असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ सुनीता सावरकर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व विचारधारा विभागातर्फे ‘ढोर-चांभार महिलांचा आंबेडकरी चळवळीतील सहभाग व सद्यस्थिती’ या विषयावर शुक्रवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी व्याख्यान पार पडले. यावेळी डॉ सावरकर मार्गदर्शन करीत होत्या.

प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व विचारधारा विभाग प्रमुख डॉ अविनाश फुलझेले यांनी भूषविले तर व्याख्याता म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ सुनीता सावरकर यांची उपस्थिती होती.

ढोर-चांभार समाजातील महिलांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकरी चळवळीतील योगदानाबाबत चर्चा करताना डॉ सविता सावरकर म्हणाल्या की, समाजाला एकत्र आणण्याच्या मुद्यांवर जास्तीत जास्त चर्चा केली पाहिजे. दोन व्यक्तींमधील संमतीचा पुरावा ५०-५० टक्के असणे आवश्यक नाही. समाजालाही समजून घेणं गरजेचं आहे. या प्रक्रियेत आपण कमी पडत आहोत. ही वस्तुस्थिती सांगणे महत्त्वाचे आहे, ढोर-चांभार समाजाला त्याचा इतिहास माहीत नाही. त्यांच्यापर्यंत वस्तुस्थिती पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. या समाजाने कालांतराने आपले योगदान दिले आहे. त्यांच्या आंदोलनात ढोर-चांभार समाजातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

Advertisement

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात घेतलेल्या महिला परिषदेच्या अध्यक्षस्थानी चांभार समाजाच्या गुणाबाई गाडेकर (वाघमारे) होत्या. त्यावेळी काही मर्यादा होत्या, तरीही त्या मर्यादा झुगारून गुणाबाईंनी चळवळीची धुरा सांभाळली. ढोर समाजाच्या सावित्रीबाई बोराडे यांनीही सहकार्य केले. बहिष्कृत भारतामध्ये सावित्रीबाई बोराडे यांच्यासह दोन महिलांचा उल्लेख आढळतो. शिवतरकर घराण्यातील वेणूबाईंचा उल्लेख जनता वृत्तपत्रात येतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीचे अडथळे तोडण्यासाठी सहभोजनची सुरुवात केली होती.

ज्यावेळी शिवतरकरांच्या घरी सहभोजनचा कार्यक्रम सुरू होता, त्याचवेळी शिवतरकर यांच्यावर बहिष्कार टाकण्यासाठी घराबाहेर चमार कामगार समाजाची बैठक सुरू होती. अनुसया शिवतरकर यांनी आंबेडकरी चळवळीसाठी आपले दागिने गहाण ठेवले होते. ही बाब डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कळताच त्यांनी शिवतरकर यांना सोडवण्यासाठी पैसे दिले, असे त्या म्हणाल्या. पी एन राजभोज यांच्या पत्नी रुक्मिणी व मुलगी शांताबाई राजभोज यांचा आंदोलनात उल्लेख आढळतो. शांताबाई तुरुंगातही गेल्या होत्या. बौद्ध धर्मात दीक्षा घेण्यापूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राजभोज यांच्या एका मुलाचे नाव बौद्ध परंपरेच्या आधारे ठेवले होते. या चळवळीत रामरतन जानोरकर यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे.

रमाबाई आंबेडकर आणि बेळगावातील चांभार समाजातील महिलांचे वेगळे नाते होते. दोघांनाही एकमेकांची भाषा समजण्यात अडचणी आल्या, पण वैचारिकदृष्ट्या ते एक होते असे त्यांनी सांगितले. दलित पँथर चळवळीतही अनेक महिलांचा उल्लेख आहे. आमची चूक एवढीच आहे की आम्ही त्याचे दस्तऐवजीकरण करू शकलो नाही. हे सर्व पूर्वी सक्रिय होते, परंतु आता नाही. आम्ही त्यांना नंतर प्रतिसाद दिला नाही. आम्ही त्यांना एकत्र ठेवू शकलो नाही. इतर समाजाने त्याला स्वीकारले नाही. याचा परिणाम कुटुंबावर आणि नंतर समाजावर होतो. तो हळू हळू निघून जातो. समाज एकत्र कसा येईल यावर बोलायला हवे. समाज संघटित करण्यावर चर्चा व्हायला हवी. ही वस्तुस्थिती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अविनाश फुलझेले यांनी महार, ढोर, चांभार समाजाचे नाते विशद करताना सांगितले की, प्रत्येक वेळी हा समाज तोडण्याचा प्रयत्न झाला, जो आजही सुरू आहे. संचालन स्मिता शेंडे यांनी केले तर आभार भीमराव फुसे यांनी मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page