सौ के एस के महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
बीड : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांचे हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्या जीवन व कार्याविषयी माहिती देताना डॉ दुष्यंता रामटेके म्हणाल्या संत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील एक थोर संत, कवी व समाज सुधाकर होते. तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे होते. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 मध्ये अमरावती जिल्हयातील यावली गावात झाला.
त्यांनी ग्रामगीता या ग्रंथातून समाज परिवर्तनासाठी महत्वपूर्ण असा संदेश दिला आहे. समाजात परिवर्तनासाठी लोकांच्या वर्तनात सकारात्मक बदल होणे अपेक्षित आहे. त्यांनी स्त्री स्वातंत्र्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. ग्रामगीता या ग्रंथातून त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले आहेत. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळणकर, पदव्युत्तर संचालक डॉ सतिश माऊलगे, कमवि उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.