‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि.३० एप्रिल रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी, उपकुलसचिव डॉ रवि एन सरोदे, मेघश्याम साळुंके, डॉ लक्ष्मीकांत आगलावे, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, तुकाराम भुरके, अरुण इंगोले, सुधाकर शिंदे, हरीश पाटील, गोविंद हंबर्डे, व्यंकटी पांचाळ, रामदास खोकले, कपिल हंबर्डे, व्यंकटी हंबर्डे, शिवाजी कल्याणकर, राजेश नाईक, मारोती कदम, दादाराव वैद्य, बबन हिंगे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com