राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना अपार आयडी व स्वयंसिद्धा पोर्टलवर डिजिटल नोंदणी करण्याचे आवाहन
विद्यार्थ्यांची डिजिटल नोंदणी आवश्यक – कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांचे आवाहन | वर्धा जिल्ह्यात प्राचार्यांसोबत जनजागृती बैठक
नागपूर | Campuskatta News : महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची डिजिटल नोंदणी करून अपार आयडी तयार करणे आवश्यक असल्याचे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी केले.
वर्धा येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स कॉलेज येथे आयोजित अपार आयडी व स्वयंसिद्धा जनजागृती बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते. या बैठकीला वर्धा जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🎓 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अपार आयडी आवश्यक
डॉ. हिवसे यांनी सांगितले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार प्रत्येक विद्यार्थ्याची डिजिटल अपार आयडी तयार करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांची तातडीने डिजिटल नोंदणी पूर्ण करावी.

👩🎓 स्त्री शक्ती पोर्टल व स्वयंसिद्धा अभियान
या बैठकीत प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची ‘स्त्री शक्ती पोर्टल’वर स्वयंसिद्धा अंतर्गत नोंदणी करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
डॉ. शालिनी लिहितकर, विद्यापीठाच्या कार्यस्थळी लैंगिक शोषण व लिंगभेद अत्याचार विरोधी संरक्षण समितीच्या अध्यक्षा, यांनी
‘स्त्री शक्ती पोर्टल’वर स्वयंसिद्धा नोंदणी कशी करावी, तसेच शासनाच्या स्वयंसिद्धा अभियानांतर्गत विद्यार्थिनींसाठी उपलब्ध विविध योजनांची माहिती दिली.

💻 अपार आयडी प्रात्यक्षिक सादरीकरण
विद्यापीठाचे आयटी समन्वयक श्री सतीश शेंडे यांनी अपार आयडी तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली, ज्यामुळे प्राचार्य व प्रतिनिधींना नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ झाली.
👥 मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीसाठी
- अधिसभा सदस्य व प्राचार्य डॉ. सचिन पोपटकर
- डॉ. संजय धनवटे
- डॉ. ससीनकर
- आयटी समन्वयक श्री सतीश शेंडे
यांची प्रमुख उपस्थिती होती.

वर्धा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी व प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल आभार मानण्यात आले.
