राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मानवाधिकार दिवसाच्या विशेष व्याख्यान
भारताने जगाला दिली मानवी प्रतिष्ठेची शिकवण
– छत्तीसगड उच्च शिक्षण विभागातील डॉ. राजकुमार सचदेवा यांचे प्रतिपादन
नागपूर : भारत मानवाधिकाराचा भक्कम पुरस्कर्ता राहिला असून जगाला भारताने मानवी प्रतिष्ठेची शिकवण दिली असल्याचे प्रतिपादन छत्तीसगड उच्च विभागातील प्राध्यापक डॉ. राजकुमार सचदेवा यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हिंदी विभागात मानवाधिकार दिवसाच्या अनुषंगाने मंगळवार, दि.१० डिसेंबर २०२४ रोजी विशेष व्याख्यान पार पडले. यावेळी डॉ. सचदेवा बोलत होते.
माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षस्थान हिंदी विभाग प्रमुख डॉ. मनोज पांडे यांनी भूषविले.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून छत्तीसगड उच्च विभागातील प्राध्यापक डॉ. राजकुमार सचदेवा यांची उपस्थिती होती. सर्वेभवन्तु सुखिन: ही घोषणा भारतीय जनतेच्या सार्वजनिक चिंतेचे सूचक असल्याचे सांगत आज जगभरात मानवी हक्काची चर्चा होत असल्याचे सांगितले. मात्र, भारतात प्राचीन काळापासूनच मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत. मानवाधकाराच्या रक्षणासाठी भारत सदैव प्रतिबध्द राहिला असल्याचे डॉ. सचदेवा यांनी पुढे बोलताना सांगितले. संत कबीर, गुरुनानक, गोस्वामी तुलसीदास, संत रविदास, संत घासिदास अशा महान तत्ववेत्यांनी आपल्या साहित्य आणि प्रवचनातून समाजाला जागृत आणि संघटित केले आहे. भारतीय तत्त्वज्ञ सामान्य लोकांचे कल्याण आणि त्यांच्या हक्कांबद्दल बोलतात, असे डॉ. सचदेवा म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना हिंदी विभाग प्रमुख डॉ. मनोज पांडे यांनी भारतीय चिंतनात संपूर्ण जगाच्या कल्याणाचे विचार आहे. आपल्या देशात मानव हा विश्वातील सर्वात बुद्धिमान प्राणी मानला गेला आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ या भारतीय संकल्पनेच्या गाभ्यात सर्वांच्या कल्याणाची भावना आहे. सर्वांशी समान आणि आदराची वागणूक ही आपल्या जीवनशैलीची मूलभूत प्रतिज्ञा आहे. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुमित सिंह यांनी केले तर आभार डॉ. लकेश्वर चंद्रवंशी यांनी मानले.