विद्यापीठ गेटपासून ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ यासाठी रॅली आयोजन
एनईपी’साठी ‘है तयार हम’
औरंगाबाद : ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’च्या प्रभावी अमंलबजावणीसाठी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-कक्ष’ (एनईपी सेल) स्थापन करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या वेळोवेळी निर्देशान्वये विद्यापीठातंर्गत लागू केलेल्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ च्या प्रभावी अंमलबजावणीस्तव कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ गेटपासून शुक्रवारी (दि.२८) सकाळी जनजागृती रॅली काढण्यात आली. या वेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.भारती गवळी, डॉ.एन.एन.बंदेला, डॉ.मुस्तजिब खान, डॉ.अंजली राजभोज, कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, डॉ.संजय कवडे यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० यासाठी खास स्लेफी पॉईंट तयार करण्यात आले. यात मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले याच्यासह प्राध्यापक,अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थींनी फोटो काढून ‘एनईपी-२०२० के लिख है तयार हम’ या ब्रिद वाक्य घेऊन फोटो काढले.
जिल्हानिहाय ‘टास्क फोर्स’
नवीन शैक्षणिक धोरणाच्या जिल्हानिहाय अंमलबजावणीसाठी प्रत्येकी ८ ते १० सदस्यांचा ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आला आहे. जिल्हानिहाय टास्क फोर्स व अध्यक्ष पुढीलप्रमाणे :- बीड जिल्हा – प्राचार्य डॉ.गौतम पाटील, औरंगाबाद – डॉ.योगिता होके पाटील, जालना – प्राचार्य डॉ.भारत खंदारे तर उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी डॉ.अकुंश कदम यांनी नियुकती करण्यात आली. सर्वच जिल्हयांचे अध्यक्ष व्यवस्थापन परिषद सदस्य असून अधिसभा, विद्या परिषद व प्राचार्यांचा यामध्ये समावेश आहे. तर चारही अधिष्ठाता हे जिल्हा निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहेत.