‘स्वारातीम’ विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये व डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्रामध्ये दि २६ जून रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे यांनी दोन्ही ठिकाणी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ एम के पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ डी एम खंदारे, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ पी विठ्ठल, प्रा डॉ बालाजी मुधोळकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ विनायक जाधव, उपकुलसचिव हुशारसिंग साबळे, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम, सहा कुलसचिव डॉ सरिता यन्नावार, रामदास पेदेवाड, डॉ लक्ष्मीकांत आगलावे, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, काळबा हनवते, उद्धव हंबर्डे, सुधाकर शिंदे, जालिंदर गायकवाड, नारायण गोरे, अनिल सोनकांबळे, रामदास खोकले, संतोष हंबर्डे, संदिप एडके, कपिल हंबर्डे, गंगाधर गुंडेराव, संभा कांबळे, प्रदिप बिडला, ऋतुराज बुक्तरे, शशिकांत लोहबंदे, शेख रशीद, शैलेश कांबळे यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.