रायसोनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बार्कलेज-कॅपजेमिनी आयडियाथॉनमध्ये दोन लाखांची तीन बक्षिसे जिंकली
पुणे : जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे येथील विद्यार्थी संघांनी आयसीटी अकादमीने आयोजित केलेल्या बार्कलेज-कॅपजेमिनी आयडियाथॉन 2024 मध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारात बक्षिसे जिंकली. रायसोनीच्या विद्यार्थ्यांनी तीन फेऱ्यांमध्ये 106 संघांशी स्पर्धा केली आणि त्यांचे नाविन्य आणि तांत्रिक कौशल्य दाखवून तीन बक्षिसे मिळविली.
सायबर सेक्युरेटी व डेटा सायन्स विभाग्चाय टीम न्यू जेन इनोव्हेटर्सने टीम लीडर शुभम संतोष सिंग याच्या नेतृत्वात 1 लाखाच्या रोख बक्षीसासह प्रथम पारितोषिक जिंकले. हेमंत चौधरी आणि डॉ दीपिका अजलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी शुभम सिंग, सत्यम विश्वकर्मा, गौरव शिरसाट, प्रीती देवाडिगा, स्नेहा कुमारी आणि श्रुती वरणकर यांनी ही कामगिरी केली. संगणक अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची टीम कॉन्सेप्ट क्रूचे टीम लीडर आदित्य दंडारे यांच्या नेतृत्वात ७५ हजार व प्रमाणपत्रसह द्वितीय पारितोषिक मिळवले.
डेटा सायन्स विद्याशाखेच्या पॉवर रेंजर्स 2.0 संघाने अनुज शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली स्पॉटलाइट पुरस्कार जिंकत 25000 रुपयाचे रोख बक्षीस जिंकले. या संघामध्ये विद्यार्थी प्रसाद धेंड, अनुज शुक्ला, क्षितीजा गोसावी आणि वैष्णवी हांडे यांचा समावेश होता, डॉ दीपिका आजलकर आणि डॉ आरती पटले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
बार्कलेज-कॅपजेमिनी येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. आयसीटी समन्वयक नीलेश सरदेशमुख आणि रायसोनी इनोव्हेशन आणि इनक्युबेशनचे प्रमुख डॉ स्वप्नील महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रायसोनी कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर डॉ आर डी खराडकर म्हणाले की बार्कलेज-कॅपजेमिनी आयडियाथॉनमध्ये आमच्या विद्यार्थ्याच्या यशस्वी कामगिरीबद्दल आम्ही आनंदी आहोत. आमचे विद्यार्थी देशभरातील सर्वोत्तम स्तरांवर स्पर्धा करत आहेत. त्यांच्या नवकल्पना, कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे त्यांना योग्य ओळख मिळत आहे.