रायसोनी कॉलेज पुणेच्या विद्यार्थ्यांना आयआयटी बॉम्बेद्वारा आयोजित टेकफेस्ट पल्स 2.0 स्पर्धेत दीड लाखाचे प्रथम पारितोषिक

पुणे : जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणेच्या कंम्प्युटर इंजीनिअरिंगच्या आर्टिफिशयल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग विभागातील दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी आयआयटी बॉम्बेत तर्फे आयोजित “टेकफेस्ट पल्स 2.0” स्पर्धेत प्रथम क्रमांकासह दीड लाखाचे रोख पारितोषिक मिळवले आहे. या विजयी संघात आयुष यादव (टीम लीडर), मैत्री दळवी, अकार्श जैन, आणि ओजस्वी दोये यांचा समावेश होता. “भारतीय भाषा प्रणालीत जनरेटिव्ह एआय प्रवाहित व एकात्मिक करणे” या समस्येच्या निराकरणासाठी त्यांनी सादर केलेले नाविन्यपूर्ण समाधान तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता आणि एआयच्या सखोल अभ्यासाचे प्रतीक होते.

आदित्य बिर्ला ग्रुपचे संचालक अनन्या बिर्ला या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शिका होत्या. महाविद्यालयाकडून युरेका सेंटर प्रमुख डॉ स्वप्नील महाजन आणि एआय व एआय-एमएल विभाग प्रमुख डॉ रचना साबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Advertisement

रायसोनी कॉलेज पुणेचे कॅम्पस संचालक डॉ आर डी खराडकर म्हणाले, “आमच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या अपवादात्मक कौशल्यांची सिद्धता केली आहे आणि महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. ही उल्लेखनीय विजय आमच्या विद्यार्थ्यांच्या तांत्रिक क्षमतेसह संस्थेच्या नाविन्यपूर्णतेसाठीच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन करतो.” नावीन्यपूर्ण संशोधन आणि उत्कृष्टतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी आमची वचनबद्धता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंगमधील नावीन्यपूर्ण प्रगतीसाठी, विशेषत: भारतीय संदर्भाशी संबंधित आव्हाने सोडवण्यासाठीच्या समर्पणावर प्रकाश टाकतो.

रायसोनी एज्युकेशनचे चेअरमन सुनील रायसोनी आणि कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page